' मैत्रीण ' (Girl Friend) is a short romantic poem that describes the sketch of the girl, I think myself and all other boys, are looking for...
🍁 मैत्रीण 🍃
(Short Romantic Valentine's Day Special Love Poem)
एक तरी मैत्रीण अशी हवी,
जरी न बघता पुढे गेलो तरी
मागून आवाज देणारी
आपल्यासाठी हसणारी
वेळ आलीच तर अश्रुही पुसणारी
स्वतःच्या घासातला घास
आठवणीने काढून ठेवणारी
वेळ प्रसंगी आपल्या वेड्या मित्राची
समजूत काढणारी
वाकडं पाऊल पडताना मात्र
मुस्काटात मारणारी
यशाच्या शिखरांवर
आपली पाठ थोपटणारी
सगळ्यांच्या गलक्यात
आपणास सैरभैर शोधणारी
आपल्या आठवणीनं
आपण नसताना व्याकुळ होणारी
खरंच! अशी एक तरी जीवा भावाची
‘ मैत्रीण ’ हवी जी,
आपणास मित्र म्हणवणारी…
- दिपक अशोक काळे
🌻🌻🍁🍄🍁🌻🌻
I hope you like this poem. If 'Yes', then please open your Heart and send it to your valentine. 💝
Also share it with your friends and loved ones. 🙂
Also share it with your friends and loved ones. 🙂
Thank You ! 🙏💕
Note: The copyright of all poems on this web-site belong to the individual authors.
No comments:
Post a Comment